खाजगी बस आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात, १ महिला जागीच ठार
Terrible accident of private bus and cruiser jeep

खाजगी बस आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात, १ महिला जागीच ठार

जालना : जालना Jalna शहरातल्या अंबड टी पॉईंट वर खाजगी बस Bus आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात accident झाल्याची घटना सकाळी सहा च्या सुमारास घडली आहे. सोलापूर Solapur जिल्ह्यातील माढा Madha तालुक्यातील चांदस Chandas येथील कुटुंब Family क्रुझर जीपने जालन्यातील रामनगर साखर कारखाना या ठिकाणी लग्न समारंभासाठी जात असताना हे अपघात घटना घडली आहे. Terrible accident of private bus and cruiser jeep

यवतमाळहुन Yavatmal मुंबईकडे Mumbai 35 प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसने या जीप ला अंबड चौफुलीवर जोरदार धडक दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता, की जीप रस्त्याच्या कडेला तीन वेळा पलटी खात कोसळली, या अपघातात जीप मध्ये असलेल्या १ महिला जागीच ठार झाली आहे.

हे देखील पहा 

८ प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटल Hospital आणि जिल्हा रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस Police ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उचरासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात सुदैवाने बस मधील एकही प्रवाशी जखमी झालेला नाही

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com