सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव

सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव
Jain Temple

भंडारा -  वरठी येथे जैन मंदिरात मध्य रात्रीच्या सुमारास चोरी झाली. हे  जैन मंदिर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. धक्कादायक!! सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव. लॉकडाउनमुळे Lockdown  सर्वच वर्कफ्रॉम करत आहेत. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य घरीच आहेत.  आता सर्वेच घरी असल्याने चोरी करने सहज शक्य नसल्याचे ओळखुन चोरांनी आता आपला मोर्च्या मंदिराकडे  वळविला आहे. (Theft at a Jain temple at Varathi)

हे देखिल पहा -  

भंडारा जिल्ह्याच्या वरठी येथे मध्य रात्रीच्या सुमारास जैन मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरांनी मंदिरातील दोन दरवाजांची लोखंडी कडी तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सर्व सामान चोरून नेले. 

यात मंदिरातील चांदीची ध्वजा, हार पैसे, चांदीचे शिक्के, मोठे 3 स्पीकर,  2 दानपेटीतील अंदाजे 15 हजार रुपये असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 

मंदिर प्रशासनाने याची तक्रार वरठी पोलिसांना दिली आहे. सकाळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. तसेच  वरठी येथील जैन मंदिर मेन रोडवरच असुन अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्याअंतरावर आहे. तरीसुद्धा चोरट्यांना पोलिसांची भीती नाही का ? असा प्रश्न प्रस्थापित झाला आहे. पुढील कारवाई वरठी पोलिस करत आहेत. 

Edited By - Puja Bonkile 

 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com