'फर्ग्युसन महाविद्यालयावर कोणाचा दबाव हा प्रश्न'

'फर्ग्युसन महाविद्यालयावर कोणाचा दबाव हा प्रश्न'

पुणे :  ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे आहे. कॉलेज प्रशासनावर कोणाचा दबाव येतो आहे, का असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभारला आहे.'' अशी भूमिका फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाच्या संयोजिका शर्मिला येवेले यांनी मांडली. 

''फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. विद्यार्थ्यांनी त्याची महिनाभर तयारी केली होती. अचानक कार्यक्रमाच्या दोन तास आधी परवानगी नकारण्यात येते. या प्रकारला विद्यार्थ्यांनी काय समजावे. ऍम्फी थिएटरमध्ये व्याख्यान परावानगी मिळाली असून आम्ही प्रांगणात हा कार्यक्रम घ्यावा लागतो. दुसऱ्या सत्रात जर हि परिस्थिती असेल तर आम्ही हिच भूमिका राहिल. ते सत्र देखील प्रणांगात घेवू.'' असे मत शर्मिला यावेळी व्यक्त केले भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने महाविद्यालयाच्या परिसरात गोंधळातच त्यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी महाविद्यालय प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवाजागर व्याख्यानमाले अंतर्गत बी. जी. कोळसे पाटील यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार आज दुपारी 12 ते 3 या वेळेत भारतीय संविधान या विषयावर महाविद्यालयातील ऍम्फी थिएटरमध्ये व्याख्यान ठेवले होते. पण, ऐनवेळी प्रशासनाने व्याख्यानाला परवानगी नाकारली. त्यामुळे महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला. अखेर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात व्याख्यान झाले.

Web Title: is there any pressure on Ferguson College

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com