चंद्रपूर येथील दारूबंदी हटविल्यानंतर निषेधाचे झळकले फलक

चंद्रपूर येथील दारूबंदी हटविल्यानंतर निषेधाचे झळकले फलक
dhule

मोठ्या लढ्यानंतर चंद्रपूरमध्ये महिलांनी दारूबंदी करण्यात यश मिळविले होते. परंतु राज्य सरकारने चंद्रपूर येथील दारू बंदी उठविल्याचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून येत आहेत. राज्यातील चंद्रपूर येथे असलेली दारूबंदी राज्य सरकारने उठवल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करीत धुळ्यातील संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकवत राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे.(There are placards of protest after the lifting of the liquor ban in Chandrapur)

चंद्रपूरमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी चंद्रपूरमधील महिलांनी मोठ्या हिमतीने जन आंदोलन छेडलं होतं आणि या जनआंदोलना नंतरच चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्यात आली होती परंतु ठाकरे सरकारने या महिलांचा कुठलाही विचार न करता चंद्रपूर येथील दारूबंदी उठवल्यामुळे याचे पडसाद धुळ्यामध्ये उमटताना दिसून येत आहेत.

हे देखील पाहा

धुळ्यातील संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा तर्फे दारूबंदी हटविणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी करून महिलांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच चंद्रपूर येथील दारूबंदी पुन्हा लागू करावी यासाठी जिल्हाअधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देखील या महिलां तर्फे देण्यात आले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com