कोरोना पॅटर्न : त्यांनी एकमेकांना पाहिले पसंत केले अन् दोन तासात लग्न आटोपले !

Saam Banner Template (27).jpg
Saam Banner Template (27).jpg

यवतमाळ : हिंदीत एक म्हण आहे, चट मंगनी पट ब्याह अगदी या म्हणीला साजेसा प्रकार यवतमाळ Yavatmal मध्ये घडला आहे. कोरोना Corona महामारीचा प्रादुर्भाव गतवर्षीपासून सुरूच आहे. या काळात जवळपास सगळं काही बदलत जात आहे. They Liked Seeing Each Other And Got Married In Two Hours

कोरोना महामारीला अटकाव घालण्यासाठी सुरु असणार लॉकडाऊन Lockdown आणि संचारबंदी Curfew अशा कालवधीत पूर्वीप्रमाणे भरगच्च मांडवात लग्न Marriage होणे बंद झाले आहे. थाटमाट करत लग्न लावून देणारे पालक आणि त्यांच्या लग्नाळू मुलांवर कोरोना महामारी संपुष्टात येईपर्यंत लग्नच नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

हे देखील पहा -

मात्र असे असतांना देखील काहीजण काळाची पावले ओळखत लग्नाचा 'कोरोना पॅटर्न' अंमलात आणत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील धनश्री दमकुंडवार व औरंगाबाद Aurangabad येथील वैभव येरावार या नवदाम्पत्याने 'चट मंगनी पट ब्याह' हा लग्न अविष्कार समाजापुढे ठेवला आहे.They Liked Seeing Each Other And Got Married In Two Hours

पुसद येथील गजानन वस्त्रालयचे संचालक प्रशांत दमकुन्डवार हे मुलीला घेवून नुकतेच औरंगाबाद येथे स्थळ पाहण्यास गेले होते. बसल्या बैठकीत मुलाला अन मुलीला एकमेकांची पसंती मिळाली मग काय साखरपुडा आणि लगेचच आठ दहा जणांच्या साक्षीने तेथेच लग्न उरकण्यात आले.

चि.सौ.कां.धनश्री व श्री.वैभव यांचा विवाह साधेपणाने हरी-कृपा नगर, सिडको औरंगाबाद येथे पार पडला. वैभव आणि धनश्रीच्या मंगल सोहळ्याला ऑनलाईन वऱ्हाड आणि नातेवाईकांनी देखील ऑनलाइन शुभाशीर्वाद देत नववधू-वरांवर शब्द सुमनांचा वर्षाव केला.They Liked Seeing Each Other And Got Married In Two Hours

लग्नाचा हा 'कोरोना पॅटर्न' Corona Pattern आता समाजात रूढ होण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना संक्रमणाच्या या कठीण संकटात लग्न खर्चात कपात करणारा हा एक 'पॉझिटिव्ह इफेक्ट' म्हणावा लागेल !

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com