अट्टल चोरट्यास अटक, तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त..

अट्टल चोरट्यास अटक, तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त..
Thief has been arrested by Sangli local crime branch

सांगली: अट्टल चोरट्यास  सांगलीच्या Sangali स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पाऊणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या कारवाई वेळी एक जण पसार झाला आहे. कारवाईदरम्यान मोबाईल आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. Thief has been arrested by Sangli local crime branch

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या Crime branch पथकाला वाळवा तालुक्यात गस्त घालत असताना केदारवाडी याठिकाणी दोन संशयित चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केदारवाडी येथील पुलाजवळ सापळा रचला.

संशयित दुचाकी स्वाराला पथकाने अडवण्यचा प्रयत्न केला असता, पोलिसांची चाहूल लागताच दोघांनी दुचाकी टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यापैकी पोलिसांनी मगर काळे (वय २१) याला ताब्यात घेत तपासणी केली. तपासणी दरम्यान त्यांच्या गाडीला लावलेल्या पिशवी मध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल आढळून आले. 

त्यांनतर काळे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, मगर काळे याने त्याच्या साथीदारासह इस्लामपूर येथील बाजारपेठेत मोबाईल तर नागाव आणि बावची याठिकाणी घरफोडी केल्याची कबूली दिली. त्यानंतर आरोपी कडून तब्बल ९ मोबाईल, सोन्याचे दागिने, दोन दुचाकी असा २ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

हे देखील पहा- 


याबाबत आरोपी मगर काळे याला अटक करण्यात आली,अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com