चोरट्यांनी चक्क काऊंटर पळविले

चोरट्यांनी चक्क काऊंटर पळविले
crime

नांदेड -  नांदेड जिल्ह्यात एका अडत दुकानातून चोरट्यांनी चक्क काऊंटर पळविले आहे . ही घटना हिमायतनगर येथे काल मध्यरात्री घडल्याची समोर आली आहे . Thieves looted the counter

ही घटना सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अविनाश संगणवार यांच्या शंकर ट्रेडिंग कंपनी या दुकानात चोरट्यांनी प्रवेश करून काऊंटर फोडण्याचा प्रयत्न केला.  

हे देखील पहा - 

परंतु चोरट्यांनी बराच वेळ प्रयत्न करुन देखील काऊंटरचा लॉक त्यांना उघडता आला नाही. त्यामुळे चोरट्यांनी चक्क दुकानातील काऊंटरच पळवला आहे. काऊंटर शहराबाहेर नेऊन त्याला फोडले आणि पाच लाख रुपये पळविले आहे. 

सकाळी चोरीची घटना समजताच संगणवार यांनी पोलिसांनाकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांची मदत घेतली आहे. परंतु, पाऊस पडल्याने श्वानाला चोरट्यांचा माग काढता आला नाही.  

चोरट्यांनी चोरीसाठी चारचाकी वाहनांचा वापर केल्याचा पोलिसांचा आंदाज आहे. दोन वर्षांपूर्वी ही अशीच चोरी झाल्याची माहिती अडत दुकानदार संगणवार  यांनी सांगितले आहे.दरम्यान, या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांत अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com