चोरट्यांनी चक्क एटीमच नेले चोरुन... 

चोरट्यांनी चक्क एटीमच नेले चोरुन... 
Thieves steal ATMs 

यवतमाळ : जिल्ह्यातील महागांव Mahagaon शहरातील City प्रभाग एक मध्ये इंडिया वन India One या बेंगलोर येथील कंपनीचे एटीएम ATM मागील सहा महिन्यापासून सुरू करण्यात आले होते. परंतु काल रात्री पावसाचा फायदा घेत कोणतीही तोडफोड न करता सहजरित्या पूर्ण एटीएम चोराने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. 

या चोरी करताना चाब्याचा वापर सुध्दा करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दोनच दिवसांपूर्वी  या एटीएम मध्ये पाच लाख Lakh रुपये टाकल्याचे सांगितले जात आहे. नेमके त्या एटीम मधून किती रुपयांची चोरी झाली हे उघड झाले नाही.

हे देखील पहा 

सोबतच चोरटयांनी सी सी टीव्ही यंत्रणा पण चोरून नेली आहे. घटनास्थळी महागांव पोलिस स्टेशनचे पोलिस Police निरीक्षक विलास चव्हाण व सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर श्वान पथकास पाचारण केले असून, पुढील तपास महागांव पोलिस करत आहेत.चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com