महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका : तीन गाईचा विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका : तीन गाईचा विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू
Three cows died in washim after touching electric wire

वाशिम: कारंजा Karanja तालुक्यातील भिवरी Bhivari येथे मागील आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस Rain Storm झाला होता. या पावसामुळे विजेचे जिवंत तार तुटून जमिनीवर पडलेले आहेत. याची माहिती शेतकऱ्यांनी धनज बु. येथील महावितरण कार्यालयाला दिली होती. मात्र वीज कंपनीने कोणतीच दखल घेतली नाही. यामुळे आज गावाशेजारी असलेल्या नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन गाईला विजेच्या तुटलेल्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. Three cows died in washim after touching electric wire

यामध्ये मदन कच्छवे या शेतकऱ्याचे एक लाख One lakh रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान गावात जनावरांना पिण्याच्या पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे गावातील सर्वच शेतकरी आपले पशुधन या नाल्यावर पाणी पिण्यासाठी नेतात. एकाच शेतकऱ्याच्या तीन गायीचा मृत्यू झाल्याने आधीच अवकाळी पावसामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा संकट ओढवले आहे.

त्यामुळे संबंदीत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com