दुर्देवी ! 3 तासाच्या फरकाने एकाच दिवशी घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

भंडारा
भंडारा

भंडारा :  एकाच दिवशी एकाच घरातील तिघांचा कोरोनामुळे Corona मृत्यू Death झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील माटोरा Motara गावात घडली  आहे. 3 तासाच्या फरकाने एकाच कुटुंबातील वृद्ध आई-वडिलांसह मुलाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.Three members Of family died of corona on the same day 3 hours apart

त्यामुळे माटोरा गावातील बोरकर कुटुंबावर एकाच दिवशी तीन मृतदेहावर अंत्यसंस्कार Funreal करण्याची दुर्देवी Unfortunately वेळ आली आहे. बोरकर परिवारावर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त येत आहे.

हे देखील पहा -

माटोरा गावात ग्रामपंचायत मार्फत घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत बोरकर कुटुंबातील 7 सदस्या पैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले, त्यांच्या वर उपचार सुरु असताना सेवानिवृत्त शिक्षक 90 वर्षीय महादेव बोरकर यांचा कोरोनाने मृत्यु झाला. Three members Of family died of corona on the same day 3 hours apart

त्यांच्यावर अंत्यसंस्कार उरकून घरी पोहचत नाही तोपर्यंत पर्वता बाई बोरकर वय 85 वर्ष यांचा ही  3 तासाच्या फरकाने मृत्यु झाला. अग्निसंकर करून आलेल्या कुटुंबातील सदस्यांना पुन्हा पर्वता बाई यांच्या अंत्यसंस्कार करावा लागला.

या सगळ्या दुःखद प्रसंगात मृतकांचा मुलगा विनायक बोरकर वय 55 यांची ही ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना दवाखान्यात घेऊन जात असतांना रस्त्यातच त्यांना कोरोनाने गाठले. Three members Of family died of corona on the same day 3 hours apart

त्यामुळे परत दोघांवर अत्यंसंस्कार करून परतलेल्या नातेवाईकांना आता तिसऱ्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अवघ्या काही तासांतच आई- वडील आणि पाठोपाठ मुलाचा मृत्यु झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मृत्यू झालेल्या विनायक बोरकर यांच्या मागे पत्नी ,3 मुले असा परिवार आहे. यावेळी एकाच कुटुंबातील तीन धगधगत्या चिता पाहुन अनेकांना शोक अनावार झाला होता.

Edited By : Krushnarav Sathe 
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com