शेतात वीज पडून तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी 

शेतात वीज पडून तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी 
khamari buj

शेतात काम करतांना अचानक आलेल्या पाऊसा सोबत वीज कडाक्यात विज पडून 3 व्यक्तींच्या मृत्यु तर 2 गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाड़ी तालुक्यातील खमारी (बूज)गावात घडली आहे. अनिता फातू सवालाखे वय 45 वर्ष, आशा संपत दमाहे वय 46 वर्ष, सहीक फीरतलाल उपराडे वय 48 असे असे मृत्यू झालेल्या व्यक्तिंचे नाव आहे. रतीलाल उपराडे व पलवी रातीराम उपरडे असे जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे.  (Three were killed and two were seriously injured in a lightning strike in a field)
 
खमारी (बूज) गावात रतीलाल उपराडे यांच्या शेतात मशागतीचे काम सूरु होते. अचानक विजेच्या गडगड़ा सह मुसळधार पाऊस सूरु झाला. दरम्यान, मजूर हरकत करतील त्याच वेळी 3 मजूरांचा आंगावर विज पडून त्यांच्या जागीच मृत्यु झाला असून त्यात 2 महिला व एका पुरुषाचा सामवेश आहे. तर शेतमालक रतीलाल उपरडे व त्याची मुलगी पलवी असे बाप लेकि गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पाहा

जखमींवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. यावेळी शेतात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. तर प्रासकीय अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले असून पंचनामा सुरु आहे. मृतकांना व जखमींना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com