कुत्र्याला फुग्याला बांधून उडवलं; दिल्लीचा यु-ट्यूबर अटकेत

कुत्र्याला फुग्याला बांधून उडवलं; दिल्लीचा यु-ट्यूबर अटकेत
dog.jpg

नवी दिल्ली : प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल देशात लोक काहीही करण्यास तयार असतात. बर्‍याच वेळा असे लोक आपला जीवही धोक्यात घालण्यासाठी मागेपुढे बघत नाहीत. तर कधीकधी ते इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. अशीच एक घटना दिल्लीहून Delhi  समोर आली आहे. हायड्रोजन बलूनला कुत्र्याला Dog  बंधून उडवल्याप्रकरणी दिल्लीच्या युट्यूबर गौरव जॉनला दिल्ली पोलिसांनी  Delhi Police अटक केली आहे. सोशल मिडियावर  Sosial Media त्याचा व्हिडओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पशू क्रूरता कायद्यांतर्गत त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. (Tied the dog to a balloon and blew it up; U-Tuber arrested in Delhi)

युट्यूबवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गौरवने आपल्या कुत्र्याला अनेक हायड्रोजन बलूनला बांधले आहे. हा त्याचा पाळीव कुत्रा आहे. कुत्र्याला बलूनला बांधून त्याने तो हवेत सोडलेला दिसत आहे. याचा त्याने व्हिडिओ बनवून तो यूट्यूब वर आपलोड केला.  आपलोड केल्यानंतर तो प्रचंड प्रमाणात व्हायरलही झाला. मात्र त्यांच्यावर सर्व स्तरतून टीका होऊ लागल्यानंतर त्याने तो डिलिटही केला. मात्र तोपर्यंत हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर लगेच दिल्ली पोलिसांनी त्याचवर पशू क्रूरता कायद्यांतर्गत अटकेची कारवाई केली आहे.

यूट्यूबवर गौरवचे चॅनेलवर चार लाख  फोलोवर्स आहे आहेत. तथापि, तीन दिवसांपूर्वी टीका झाल्यानंतर त्याने आपला व्हिडिओ डिलीट केला.  मात्र त्याने हा व्हिडिओ बनवताना सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या होत्या. असेही सांगितले.पण  व्हिडिओ मोठा असल्यामुळे  त्यात त्या सुरक्षेच्या उपाययोजा दिसू शकल्या नाहीत, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.  तसेच त्याने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून आपण आपल्या  पाळीव प्राण्यांबरोबर मुलांप्रमाणे वागत असल्याच स्पष्टीकरणही दिले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com