दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर


पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दोन्ही परीक्षांची सुरुवात 15 फेब्रुवारीपासून होत आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

वेळापत्रकानुसार दोन्ही इयत्तांचे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. परीक्षेला सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. दहा ते सव्वादहा या वेळेत उत्तरपत्रिकेचे वाटप होणार आहे. त्यापुढील 15 मिनिटांत प्रश्‍नपत्रिका दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या व्यवस्थित वाचण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. 

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर केली असून यंदा बारावीची परीक्षा 26 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू होईल.

दहावीची परीक्षा 20 मार्च, तर बारावीची परीक्षा 30 मार्च रोजी संपणार आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निवेदनात नूमद केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर सुटी देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक cbsc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
 

Web Title: Time table of CBSE Board exam for 10th and 12th declared

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com