मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात आज बीडमध्ये मोर्चा

मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात आज बीडमध्ये मोर्चा
maratha reservation maratha reservation

बीड  - मराठा आरक्षण Maratha Reservation प्रश्नावर राज्याच्या राजकारणात खूप मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने Supreme Court मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज बांधवांमधून मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.  Today Morcha in Beed regarding Maratha reservation issue

याच अनुषंगाने मराठा आरक्षणावर फेरविचार होण्यासंदर्भात आणि राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज बीडमध्ये Beed विनायक मेटे Vinayak Mete हे मराठा आरक्षणासाठीचा राज्यातील पहिला मोर्चा काढत आहेत.

या मोर्चाला सकाळी 11 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पासून सुरुवात होणार असून मोर्चा सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. Today Morcha in Beed regarding Maratha reservation issue

हे देखील पहा -

दरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोर्चाला परवानगी दिली नाही. मात्र विनायक मेटे मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे हा मोर्चा प्रशासन निघू देणार का ? निघाला तर किती मराठा बांधव यामध्ये सहभागी होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Edited By : Krushanarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com