विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
electricity

विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

बीड: सरपण घेऊन शेतातून घरी येत असलेल्या पती पत्नीचा, विद्युत वाहक वायरला चिटकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीडच्या (Beed) जरुड गावात घडली आहे. वैजिनाथ शामराव बरडे वय 33 व शोभा वैजिनाथ बरडे वय 29 अशी मृत पती-पत्नीचे नावे आहेत. तर या दांपत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व वीज चोरून वापरणाऱ्या व्यक्तीवर बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने बरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्याच्या वीजेचा करंट लागून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. (Tragic death of husband and wife due to electric shock)

बीड तालुक्यातील जरुड येथील मृत वैजीनाथ बरडे व शोभा बरडे हे पती पत्नी शेतातुन सरपण घेऊन घरी जात असताना, शोभा यांचा पाय वायरावर पडल्यामुळे, त्यांना शॉक लागून त्या खाली कोसळल्या. त्यावेळी वैजिनाथ यांना पत्नी खाली का पडली? हे न समजल्यामुळे त्यांनी पत्नीला उचलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शॉक लागल्याने दोघांचाही मृत्यू झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. तर या घटनेची माहिती पिंपळनेर पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी ठाणेप्रमुख शरद भुतेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत.

हे देखील पाहा 

या घटनेनंतर नातेवाईकांनी चोरून आकडा टाकणारे रामकिसन विश्वनाथ काकडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती . मयत वैजिनाथ बरडे यांचा मुलगा अक्षय बरडे याच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीवरून आरोपी रामकिसन विश्वनाथ काकडे याच्या विरोधात कलम 304 नुसार मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या दिवसात वादळी वारा आणि पाऊसामुळे अनेक वेळा विद्युत वाहक तारा आणि वायर तुटून पडलेली लक्षत येत नाही. त्यामुळं ग्रामीण भागात असे अपघात घडत असतात. म्हणून प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुटलेल्या विद्युत तारा वायर वेळीच दुरुस्त केल्या तर असा अपघात होणार नाही.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com