कोरोना रुग्णांवरील उपचार; पैसे परत न दिल्यास कारवाई करणार - अरविंद लोखंडे

कोरोना रुग्णांवरील उपचार;  पैसे परत न दिल्यास कारवाई करणार - अरविंद लोखंडे
Collector's Office

लातूर - कोरोना रुग्णांच्या corona Patients उपचारावरील बिलांचे Bill लेखा परीक्षण केले. तेव्हा जिल्ह्यातील 14 रुग्णालयांना Hospital सुमारे 23 लाख 71 हजार 101 रुपयांची ज्यादा बिले आकारली आहेत. असे ही घटना समोर आली आहे. दरम्यान संबंधित रुग्णालयात Hospital नोटीस Notice पाठवण्यात आली आहे. जास्त आकारलेली रक्कम रुग्णांना परत करावी असे कळविण्यात आले असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी सांगितले आहे. 
 
खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांवर जास्तीच्या बिलाची आकारणी होणार नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक खाजगी रुग्णालयासाठी  लेखापरीक्षकांची नियुक्ती केली होती. 

हे देखील पहा - 

सदर लेखापरीक्षकांनी केलेल्या लेखापरीक्षणात 14 रुग्णालयांनी 23 लाख 71 हजार 101 इतकी रक्कम ज्यादा आकारली असल्याचा अहवाल त्यांनी दिला  आहे. तसेच काही लेखापरीक्षण अहवाल प्रलंबित आहेत. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नोडल अधिकाऱ्यांची आणि ऑडिटर यांची नेमणूक केली आहे. 

त्यांचे दूरध्वनी क्रमांक हॉस्पिटलच्या रिसेप्शन आणि नोंदणी काऊंटरवरील दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच काही हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने मधील लाभार्थ्यांना आरोग्यमित्र नेमून दिलेले आहेत. त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास हॉस्पिटलच्या ऑडिटरकडे संपर्क साधावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांनी यावेळी केले आहे. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com