जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्याच्या नरेश्वर डोंगरावर वृक्षारोपन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्याच्या नरेश्वर डोंगरावर वृक्षारोपन
Tree planting on Nareshwar hill in Pune on the occasion of World Environment Day

पुणे: जंगल वाढ व त्याचे संगोपन आणि जंगली प्राणी पक्षांना अन्न पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी सणसवाडी ग्रामस्थांनी  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त World Environment Day सणसवाडी औद्योगिक वसाहत परिसरातील नरेश्वर डोंगरावर वृक्षारोपन केलं आहे. Tree planting on Nareshwar hill in Pune on the occasion of World Environment Day

पुणे Pune जिल्ह्याच्या शिरूर Shirur तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक वसाहत परिसरामध्ये नरेश्वर मंदिर परिसरात नरेश्वर मंदिर वनराई समितीच्यावतीने आणि सणसवाडी ग्रामस्थांच्यावतीने जंगली झाडांचे रोपण करण्यात आले. गेल्या ५ वर्षापासून या परिसरामध्ये देशी झाडांचे मोठ्या प्रमाणात रोपण केल्याने या भागात होणारा हिरवगार पणा आणि ऑक्सिजन युक्त असं वातावरण त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात याकडे कल असतो. आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधत दाट फळझाडांची वृक्षारोपण करण्यात आलं असून पाणी पाईप लाईन यांसारख्या सुविधा देऊन श्रमदानातून या भागाचा हिरवागार असे वनराईत रूपांतर करण्यात आलं आहे.

मागील चार वर्षापासुन सणसवाडी ग्रामस्थांच्या श्रमदानातुन नरेश्वर डोंगरावर जंगलाचे संगोपन करत आहे.  या जंगलाचा विस्तार प्रत्येक वर्षी वाढत असुन यंदा या जंगलात फळवाटिका उभारण्यात येत आहे. या फळवाटिकेतुन जंगलातील पशु पक्षांना अन्नाची व्यवस्था जंगलातच होणार आहे. त्यामुळे पशु पक्षांना पुढील काळात अन्नपाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

हे देखील पहा - 

कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे वृक्ष संगोपनाचे महत्व प्रत्येकाला कळाले मागील चार वर्षात नरेश्वर मंदिर परिसरातील जंगलात 3 हजारांचे  वृक्षांची लागवड करुन वृक्षांचे संगोपन करण्यात आले. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com