बारावी नापास युवकाने फेसबूकवर विणले हनी ट्रॅपचे जाळे !

Twelfth failed youth cheated by Honey Trap on Facebook
Twelfth failed youth cheated by Honey Trap on Facebook

गडचिरोली : शिक्षणात ढ असणाऱ्या एका युवकाने यु-ट्यूबच्या You Tube साहाय्याने विघातक कौशल्य आत्मसात करीत फेसबुकवर Facebook  हनी ट्रॅपचे जाळे पसरवले. त्या माध्यमातून तो बहाद्दर इतरांना ब्लॅकमेल करू लागला. हा प्रकार उघड झाल्यानंतर गडचिरोली Gadchiroli पोलिसांच्या सायबर Cyber शाखेने आरमोरी येथून आरोपी युवकाला अटक केली आहे. Twelfth failed youth weaves honey trap on Facebook 

नत्थू खेवले (वय ३९) असे या आरोपीचे नाव आहे. मिळेल ते काम करणारा युवक कोरोना Corona लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने मोबाईलवर अतिसक्रिय झाला. याच काळात नत्थू खेवले याने इंटरनेटवरून Internet प्रॉक्सी सर्व्हरचे Proxy server तंत्र शिकून घेतले. या तंत्रातून तयार केलेल्या बनावट आयडीचा शोध घेणे अवघड असते.  

युवती असल्याचे भासवून फेसबुकवर युवकांना आमंत्रण देत त्यांचे अश्लील व्हिडिओ करण्याचे काम या युवकाने सुरू केले. काही दिवसांनी हेच व्हिडिओ वापरून त्याने खंडणी वसुली सुरू केली. हा प्रकार अनेक लोकांसोबत झाला होता तरी बदनामीपोटी कुणी स्वतःहून पुढे येत नव्हते. 

हे देखील पहा - 

मात्र यातील एका पीडित युवकाने धाडस दाखवून याबाबत तक्रार केली. गडचिरोली पोलिसांनी सायबर गुन्हा दाखल केला. पाठलाग करून आरोपी युवकाला अटक केली. अशा पद्धतीने जाळ्यात फसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Edited By-Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com