आईच्या उपचारासाठी १२ वर्षाच्या मुलावर आली भीक मागण्याची वेळ

आईच्या उपचारासाठी १२ वर्षाच्या मुलावर आली भीक मागण्याची वेळ
akola boy

अकोला - कॅन्सर Cancer असलेल्या आईला लागणाऱ्या उपचारासाठी आणि उदर निर्वाहासाठी भीक मागण्याची वेळ 12 वर्षाच्या मुलावर आली आहे. हृदय हेलावून टाकणारी ही घटना अकोल्यातील Akola आहे. वडिलांचे छत्र हरविलेले, आईला कॅन्सर, काेराेनाचं Corona संकट त्यामुळे मदतीच्या हातांनाही  मर्यादा मात्र यामधून मार्ग काढत एका १२ वर्षांच्या चिमुकल्याने आईच्या उपचारासाठी अकाेल्यातील रस्त्यावर भीक मागून पैसे गोळा करण्याचा मार्ग पत्करला . भीक मागून जी रक्कम जमा हाेईल त्यामधून तो आईच्या औषधांचा Medicine खर्च भरून काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समाेर आले आहे.  विक्की मांडाेकार असे या मुलाचे नाव आहे. twelve year old boy is begging for his mothers health

विक्कीची आई शाेभा ही गेल्या वर्षभरापासून आजारी आहे. दिवाळीच्या दरम्यान विक्कीच्या आईला कॅन्सर या आजाराने वेढले असल्याचे समाेर आले अन् या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. पदरात तीन मुलं, पतीचे निधन झालेले, हातमजुरीवर घराचा उदरनिर्वाह अशा स्थितीत उपचाराचा खर्च झेपायचा तरी कसा, असा प्रश्न उभा ठाकला त्यानंतर शोभा यांचा भाऊ मदतीला आला.

त्याने अकाेल्यातील तुकाराम हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, तिच्यावर शासकीय याेजनेत उपचाराची साेय झाली, मात्र केमो सरकारी योजनेतून जरी होत असला तरी वरील लागणाऱ्या औषधांसाठी पैसे आणायचे कुठून  तसेच प्रत्येक केमाेसाठी अकाेल्यात येऊन औषधांचा खर्च याकरिता मांडोकार परिवाराची ओढाताण सुरू झाली. दरम्यान गावातील सरपंचांनीही एका केमाेसाठी मदत केली. twelve year old boy is begging for his mothers health

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने उद्रेक सुरू केला, त्यामुळे या परिवाराच्या अडचणीत भर पडली, आठ व पाच वर्षांच्या दाेन्ही मुलांना भावाकडे साेपवून शाेभा यांनी अकाेल्यात हाॅस्पिटलच्या आश्रयाला राहणे पसंत केले. औषधांसोबत राेजच्या खाण्यापिण्याचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्नच होता. विक्कीने तुकाराम हाॅस्पिटल ते आसपासच्या अनेक परिसरात फिरून मदत मागण्यास सुरुवात केली. त्याला अनेकांनी मदत केली.

हे देखील पहा -

विक्की  मदतीसाठी  याचना करतानाचा फाेटाे आणि त्याच्या परिस्थितीचे वर्णन करून साहील गवई या युवकाने त्याच्या व्हाॅटस्ॲपच्या स्टेटसवर ठेवला हे स्टेटस पाहून युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे यांनी विक्कीची माहिती घेऊन थेट रुग्णालय गाठले. सगळी परिस्थिती समजून घेत त्याला उपचारासाठी तसेच खाण्यापिण्यासाठी मदतीचा हात दिला.  त्यांच्यासह काही युवकांनी सागर खंडारे यांच्या समवेत मदतीसाठी पुढाकार घेतला. twelve year old boy is begging for his mothers health

शाेभा यांच्यावर आता शेवटचा केमाे बाकी आहे. अवघ्या सातव्या वर्गात शिकत असलेल्या विक्कीवर सर्व परिवाराचा भार येऊन पडला असल्याने दातृत्वाच्या हातांनी पुढाकार घेतल्यास या परिवाराला सावरण्यासाठी मदत होईल.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com