धक्कादायक : बीडच्या शिरुर कासार येथील कोविड केअर सेंटरमधून 22 रुग्णांचे पलायन..!

धक्कादायक : बीडच्या शिरुर कासार येथील कोविड केअर सेंटरमधून 22 रुग्णांचे पलायन..!
बीड

बीड - बीडच्या Beed शिरूर कासार Shirur Kasar येथे सुरू असणाऱ्या  कोविड केअर सेंटर मधून, तब्बल 22 रुग्णांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. TwentyTwo Patients Escaped From The Covid Center at Shirur Kasar in Beed

शिरूरच्या शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर Covid Center आहे. या सेंटरमध्ये सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या, कोरोना बाधित रुग्णांना ठेवून उपचार Treatment केले जातात.  

हे देखील पहा -

मात्र 14 मे ते 21 मे या सात दिवसात, या सेंटरमधून तब्बल 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पळ Run काढल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील शिरूर, बावी, आनंदगाव, घोगस पारगाव, पौंडुळ, जांब, मानूर, हिवरसिंगा,झापवाडी, दगडवाडी, नारायनवाडी या गावातील हे रुग्ण आहेत ज्यांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढला आहे.TwentyTwo Patients Escaped From The Covid Center at Shirur Kasar in Beed

तर या सात दिवसात 22 रुग्ण पळून जाताना, आरोग्य विभाग आणि सुरक्षा रक्षक काय करत होते ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी शिरूर कासार पोलीस Police ठाण्यात या 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर गुन्हा FIR दाखल करण्यात आला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com