फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री नको; #RejectFadnavisForCM ट्रेंड

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री नको; #RejectFadnavisForCM ट्रेंड

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच ट्विटरवर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी नको असा ट्रेंड सुरु झाला आहे. बेरोजगारी, आरेतील वृक्षतोड, शेतकरी आत्महत्या, पूर परिस्थिती यावरून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.


सत्ता स्थानपनेबाबत भाजप-शिवसेनेकडून अद्याप काही निश्चित सांगण्यात येत नाही. ट्विटरवर सोमवारपासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी पुन्हा नकोत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर ट्विटरकर करताना दिसत आहेत. #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅगचा वापर करून खूप ट्विट होत आहेत. या माध्यमातून फडणवीसांविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकरी आत्महत्या, आरेमधील वृक्षतोड, बेरोजगारी, कोल्हापूर-सांगलीतील पूर परिस्थिती अशा विविध मुद्द्यांवरून फडणवीसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेने भाजपसोबतची युती संपुष्टात आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे, असे मतही काही जणांनी व्यक्त केले आहे. फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईन'च्या या घोषणेची विविधप्रकारे खिल्ली उडविण्यात आली आहे.


Web Title: twitter trend against Maharashtra CM and BJP leader Devendra Fadnavis

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com