धुळ्यात लाखो रुपयांच्या गुटख्यासह दोघांना अटक !

धुळ्यात लाखो रुपयांच्या गुटख्यासह दोघांना अटक !
Two arrested with gutkha worth lakhs of rupees in Dhule

धुळे : बंदी असताना देखील विविध ठिकाणी अवैध तस्करी चालू असते. असाच एक अवैध तस्करीचा प्रकार धुळे जिल्यात सापडला आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारामध्ये सुरत नागपुर महामार्गावरून गुटख्यांच्या तस्करीचा ट्रक  सापडला होता. Two arrested with gutkha worth lakhs of rupees in Dhule

पोलिसांना संशय आला असता त्यांनी तो ट्रक अडविला. त्यामध्ये असलेल्या मालासंदर्भात विचारणा केली असता ट्रक चालक व वाहक यांनी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरं पोलिसांना दिली. 

त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी ट्रक ची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटका व सुगंधी पानमसाला असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी हा ट्रक जप्त केला आहे. या ट्रकला तालुका पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा आणण्यात आले.

हे देखील पहा - 

या कारवाईमध्ये ट्रक चालक व वाहक यांच्यासह लाखो रुपयांचा गुटखा भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. राज्यामध्ये गुटखा बंदी असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा कुठून आणण्यात येत होता ?  तो कुठे नेला जात होता याची संपूर्ण तपासणी आता तालुका पोलीस करीत आहेत.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com