चिंकारा हरणाची शिकार करणारे दोघे वनविभागाच्या जाळ्यात

चिंकारा हरणाची शिकार करणारे दोघे वनविभागाच्या जाळ्यात
chinkar

पुणे - संरक्षित प्राणी असलेल्या चिंकारा हरणाचे chinkara deer शिकार Hunting करणाऱ्या दोघांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलामध्ये पाठलाग करून जेरबंद केले आहे. पुणे Pune विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री ही धाडसी कारवाई Action केली.  Two chinkara deer hunters in a forest trap

महेश जंगलु मने (वय 40, रा. सणसर इंदापूर पुणे) आणि दत्तात्रेय पोपट पवार (वय 42, रा. बोरी, इंदापूर, पुणे) अशी अटक Arrested करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 9 बोरची रायफल, 6 जिवंत काडतुसे आणि 1 वापरलेले काडतूस जप्त करण्यात आले आहे. 

हे देखील पहा -

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वन विभागाचे काही कर्मचारी मंगळवारी रात्री इंदापूर वनपरिक्षेत्रात गस्त घालत होते. यावेळी त्यांना जंगलात बॅटरीचा उजेड दिसून आला. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता दुचाकीवर दोन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत दिसले. Two chinkara deer hunters in a forest trap

त्यानंतर त्यांनी पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ असलेल्या एका गोणीत चिंकारा जातीची हरीण मृतावस्थेत सापडले. त्यांनी बंदुकीने या हरणाची शिकार केली होती. त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1), (ड) (1) व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2(16), 9, 11 व 5 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  Two chinkara deer hunters in a forest trap

ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यकवनसंरक्षक आशुतोष शेडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल जंक्शन अशोक नरुटे आणि वनरक्षक पूजा काटे यांच्या पथकाने केली.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com