मुंबईत दोन मास्क बंधनकारक? (पहा व्हिडिओ )

मुंबईत दोन मास्क बंधनकारक? (पहा व्हिडिओ )
Double mask

मुंबई : मुंबईमध्ये Mumbai बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. परंतु जशी बाधितांची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे मुत्यू Dead होणाऱ्यांचे देखील प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात कोरोनामधून Corona बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी नव्या बाधितांची संख्याही कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. Two masks mandatory in Mumbai

विषाणूंचा Corona Virus संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क Mask लावत आहेत. चीनच्या China दुसऱ्या लाटेमधे सुद्धा कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे. तिथेही लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे.

मुंबईची Mumbai कोरोनाची स्थिती पाहता आता मुंबईत आता दोन मास्क Face Mask बंधनकारक असणार आहेत. कपड्याचे मास्क वापरणाऱ्यांनी या मास्कच्या आतमध्ये सर्जिकल मास्क Surgical mask वापरा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने Mumbai Municipal Corporation BMC केले आहे.

N -95 मास्क आणि वैद्यकीय मास्कमुळे ९५ टक्के संरक्षण मिळते. तर सुती मास्कमुळे कोणतेही संरक्षण मिळत नाही, असा दावा पालिकेच्या "माय बीएमसी " या ट्विवटर हॅण्डलवरून करण्यात आला आहे. मात्र, हे आवाहन पालिकेने नेमके कशाच्या आधारावर केले आहे असा प्रश्न विचारात अनेक नागरिकांनी यावरती आक्षेप नोंदवला आहे.

Edited By- Digambar Jadhav 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com