काळ्या रंगाच्या दुर्मिळ मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
snake

काळ्या रंगाच्या दुर्मिळ मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

पुणे - आंबेगाव Ambegaon तालुक्यातील भराडी येथे काळ्या रंगाच्या दोन मांडुळ सापांची Snake तस्करी करणाऱ्या दोन तरुणांना मांडुळांची देवाणघेवाणीसाठी जात असताना मंचर Manchar पोलीसांनी Police सापळा रचुन ताब्यात घेतले असुन मांडुळांना वनविभागाकडे Forest Department सुरक्षित सुपुर्द करण्यात आले आहे. मांडुळ साप तस्करांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39/3 सह कलम 51 नुसार मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी राजगुरु व सुनील पवार अशी मांडुळ तस्करी Smuggling करणाऱ्यांची नावे आहे. Two people arrested for smuggling a rare black sanke

पुण्याच्या Pune ग्रामीण भागात काळ्या रंगाच्या मांडुळ तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मंचर पोलीसांना मिळाल्यानंतर मागील काही दिवसांपासून या तस्करांच्या मार्गावर असताना दोन तरुण आंबेगाव तालुक्यातील भराडी फाटा येथे दुर्मिळ काळ्या रंगाच्या मांडुळाची देवाणघेवाण करण्यासाठी आले असताना मंचर पोलीसांनी सापळा रचुन दोन तस्करांना मांडुळांसह ताब्यात घेतले. या मांडुळांची विक्री करण्यासाठी जात असल्याची कबुलीही या तस्करांनी दिली आहे. त्यानुसार दोघांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक सुधाकर कोरे Sudhakar kore यांनी दिली. 

कोरोना महामारीच्या संकट काळात जगण्या मरण्याची लढाई सुरु असताना मांडूळ तस्कर मात्र तस्करीमध्ये व्यस्त आहे. या मांडुळाची तस्करी करुन लाखो रुपयात विक्री केले जात आहे. पुढील काळात अशा तस्करांना रोखण्याचे आव्हान वनविभागासह पोलिसांसमोर आहे. Two people arrested for smuggling a rare black sanke

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com