अत्यंत हृदयद्रावक ! एकाच दिवशी वाघाच्या दोन बछड्यांचा आणि अस्वलाचा  मृत्यू...

अत्यंत हृदयद्रावक ! एकाच दिवशी वाघाच्या दोन बछड्यांचा आणि अस्वलाचा  मृत्यू...
Two tiger calves and a bear die on the same day

भंडारा : वाघिणीच्या नवजात बछड्याचा Calves दुर्दैवी अंत झाल्याची आणखी एक घटना भंडारा Bhandara जिल्ह्यातील पवनी वन परिक्षेत्र Pavani Forest Range अंतर्गत गुडेगाव बीट येथे नुकतेच उघडकीस आली आहे. आज गराडा/ बूज (पहेला) येथे वाघाच्या दोन बछड्यांची विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना काही तासातच पवनी वन परिक्षेत्रात ही दुसरी घटना चिंतेचा विषय ठरत आहे. Two tiger calves and a bear die on the same day

दुसरीकडे खापा राउंडच्या कक्ष क्रमांक 286 भंडारा वन विभागा अंतर्गत एका नर अस्वलाचा Bear मृतदेह आढळून आला आहे. एकाच दिवशी वाघाच्या दोन बछड्यांचा आणि अस्वलाचा मृत्यू झाल्याच्या या घटना वन्यजीव प्रेमींसाठी हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. प्राप्त माहितीनुसार पवनी वन परिक्षेत्र अंतर्गत गुडेगाव Gudegaon बीटमध्ये एका वाघिणीला दोन बछडे असतांना तिने एका बछड्याला गुडेगाव बीट मधील जंगलात परित्यक्त केले. 

हे देखील पहा -

वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्या बछड्याचे  पोषण करून ज्या ठिकाणी वाघिणीने Tigeress सोडले त्याच ठिकाणी वाघिणीची भेट होईल या आशेने ठेवले  संपूर्ण घटनाक्रमावर वन विभाग उप संरक्षक नजर ठेवून होते. मात्र आज सकाळ पर्यंत वाघीण आलीच नाही, आणि त्या एकट्या नवजात बछड्याचा दुःखद मृत्यू झाला. Two tiger calves and a bear die on the same day

दुसरीकडे बीट गार्ड फुलसुंगे गस्तीवर असतांना त्यांना एक नर अस्वल मृतावस्थेत  आढळून आले.  त्यांनी वरिष्ठांना माहिती देत, चमु घटनास्थळावर पोहोचले. मृत्युचे नेमके कारण अजुन कळले नसून पुढील तपास सुरु आहे. 


Edited By-Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com