संभाजीराजेंच्या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही - उदयनराजे

संभाजीराजेंच्या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही - उदयनराजे
Udayanraje - Sambhajiraje

सातारा : खासदार संभाजीराजे छत्रपती Sambhajir Raje यांनी जाहीर केलेल्या आंदोलनाला agitation विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही, पण आंदोलन करण्याची वेळ का आली हे बघणं गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजे भोसले Udayan Raje यांनी दिली.  Udayanraje Reaction on Sambhajiraje Agitation on Maratha Reservation

मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळण्यासाठी येत्या १६ जूनपासून आंदोलन सुरु करण्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज रायगडावरुन Raigad जाहीर केलं, त्याबाबत छत्रपती उदयनराजे बोलत होते. 

हे देखिल पहा

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी येत्या १६ जूनपासून आंदोलन सुरु करण्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज रायगडावरुन जाहीर केलं. रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी संभाजीराजे यांनी ही घोषणा केली. सर्व पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन संभाजीराजे यांनी यावेळी केलं. त्याबाबच 'साम टिव्ही'शी बोलताना उदयनराजे यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली. Udayanraje Reaction on Sambhajiraje Agitation on Maratha Reservation

संभाजीराजे यांनी जाहीर केल्या नुसार १६ जूनला पहिला मोर्चा काढण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँगमार्च काढण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरुन आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. आज पर्यंत सहन केलं आता सहन करणार नाही, आमच्याकडं फक्त आंदोलनाचा पर्याय उरला आहे, असं सांगत मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा समाजाला वेठीला धरू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

या सगळ्या आंदोलनाबाबत बोलताना उदयनराजे यांनी आरक्षणाचा प्रश्नामध्ये केंद्राचा संबंध येत नाही राज्य सरकारनेच अधिवेशन घेऊन त्यांची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, "आंदोलन करायची वेळ येतेय ही दुर्दैवी बाब आहे. इतर जातींना जीआर काढून आरक्षण दिलंय, त्यांचं आरक्षण काढू नका. गायकवाड आयोगाच्या अहवालाच वाचन व्यवस्थित झालं नसावं. ते झालं असत तर कोर्टाने आरक्षणाबाबत असा निकाल दिला नसता," Udayanraje Reaction on Sambhajiraje Agitation on Maratha Reservation

"मन अत्यंत दु खी झालं आहे. कारण प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो पण त्यांचे विचार आचरणात आणले जात नाहीत. लोक आत्मकेंद्रित करताहेत आज शिवाजी महाराजांना अभिप्रेत अशी ही लोकशाही नाही.  शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले नाहीत तर देशाचे तुकडे होतील,'' असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. एक सांगतो जर लोकांचा जर उद्रेक झाला आणि जातीजातीत उद्रेक झाला तर  लोक तुम्हाला सोडणार नाहीत, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com