उल्हासनगरात एका इसमाची २० रुपयांसाठी निर्घृण हत्या

उल्हासनगरात एका इसमाची २० रुपयांसाठी निर्घृण हत्या
ulhasnagar

उल्हासनगर -  २० रुपये देण्यास नकार दिल्याने एका इसमाची निर्घृण हत्या Murder झाल्याची घटना रविवारी Sunday मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर Ulhasnagar कॅम्प पाचच्या जय जनता कॉलनी Jai Janta Colony परिसरात घडली आहे. अनिल आहुजा Anil Ahuja असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. अनिल हा चहाच्या दुकानावर Tea Shop कामाला असून कुटूंबासोबत तो जय जनता कॉलनी परिसरात राहत होता. In Ulhasnagar 1 person was brutally murdered for 20 Rs

रविवारी रात्रीच्या सुमारास गांजाडी आरोपी साहिल मैराळे हा जय जनता कॉलनी मधील एका गल्लीत गांजा पिण्यासाठी बसला होता.रस्त्याने जाणाऱ्या अनिल कडे २० रुपये मागितले होते.

हे देखील पहा -

ते  देण्यास अनिलने नकार दिला म्हणून आरोपी साहिल याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून अनिल वर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी अनिलला मृत घोषित केले ,ह्या घटनेने नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. In Ulhasnagar 1 person was brutally murdered for 20 Rs

हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीच्या शोधासाठी एक पथक तात्काळ रवाना करण्यात आले आणि अवघ्या २ तासात आरोपी साहिल याला कॅम्प ४ च्या सर्टिफाईट ग्राउंड जवळून ताब्यात घेण्यात आले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला चाकू आढळून आला. आता याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली असून त्याच्या विरोधात कलम ३०२ ,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पोपट करडकर हे करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com