किल्ल्यांचा खरा इतिहास जाणण्यासाठी मोडी शिकण गरजेच 

किल्ल्यांचा खरा इतिहास जाणण्यासाठी मोडी शिकण गरजेच 

पुणे : ''किल्ल्यांचा इतिहास असलेली पाच कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत; परंतु, ती सर्व मोडी लिपीत आहेत. त्यातील फक्त दोन लाख कागदपत्रे वाचून झाली असतील. त्यामुळे अजूनही माहीत नसलेला इतिहास समोर येणे बाकी आहे. किल्ल्यांचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी मोडी लिपी शिकणे गरजेचे आहे,'' असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले. 

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे बलकवडे यांची मुलाखत लेखक संदीप तापकीर यांनी घेतली. या वेळी तापकीर यांनी लिहिलेल्या 'अपरिचित दुर्गांची सफर' या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे यांच्या हस्ते झाले. या वेळी पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे उपस्थित होते. 

बलकवडे म्हणाले, ''गडकोट हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा कणा होता. भारतातील इतर किल्ले आणि महाराष्ट्रातील विशेषतः सह्याद्रीच्या किल्यांमध्ये फरक आहे. आपल्या किल्ल्यांचा इतिहास देदीप्यमान आहे. इथे खूप मोठा संघर्ष झाला. स्वतंत्र्यापूर्वी इंग्रजांनी गडकोटाच्या वाटा सुरुंग लावून पाडल्या. दुर्गबंदी केली. कारण, किल्ले हे स्वराज्याचे प्रेरणास्थान आहेत, हे त्यांच्या लक्षात आले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले. महाराष्ट्रात किल्ले, गडकोट, जलदुर्ग यांची संख्या खूप मोठी आहे. किल्ल्यांकडे जाऊन ते अभ्यासले जावेत.''

Web Title: For understanding the original history of forts first learn Modi script said history expert Pandurang Balkawade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com