केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : मुंडे राणेंना केंद्रात मंत्रिपद ?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : मुंडे राणेंना केंद्रात मंत्रिपद ?
Narayan rane Pritam Munde

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ Union Cabinet Expansion विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे. शुक्रवारी पंतप्रधान PM Narendra Modi नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित shah Amit Shah व भाजप अध्यक्ष जे पी नड्डा J P Nadda यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आहे. या बैठकीवरून आता नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.  Union cabinet expansion: Munde Rane to become Union Minister?

या विस्तारामध्ये महाराष्ट्रातून दोन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. केंद्रीय ग्रामविकासमंत्री राहिलेले स्व.गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांच्या कन्या प्रीतम मुंडे Pritam Munde यांना केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते अशी चर्चा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर मुंडे कुटुंबात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद मिळू शकते. 

शिवसेना Shivsena व भाजपच्या शह काटशहाच्या राजकीय पार्श्वभूमीवर व आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरे ठेवून, शिवसेनेच्या कट्टर विरोधक असणाऱ्या नारायण राणेंना  Narayan Rane देखील केंद्रीय मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. सध्या नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत.

हे देखील पहा -

नारायण राणेंना केंद्रीय मंत्री बनवून कोकणात भाजपला BJP मजबुती देण्याची हि एक रणनीती देखील असू शकते. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटन प्रसंगी अमित शहा उपस्थित होते.

शिवसेनेच्या  कोट्यातील एक कॅबिनेट मंत्री पद खाली आहे. त्या  कॅबिनेट  मंत्री पदी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. आगामी बीएमसी BMC निवडणूक  आणि कोकणात भाजपाला मजबूत करून शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना मोदी कॅबिनेट मध्ये स्थान मिळू शकते. तर मराठवाड्यातून प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com