रस्त्यासाठी युवकाने मोबाईल टॉवर वर चढत केले अजब आंदोलन 

रस्त्यासाठी युवकाने मोबाईल टॉवर वर चढत केले अजब आंदोलन 
Unique agitation as the youth climbed the mobile tower for the damaged road

अकोला: दुरवस्था झालेल्या अकोला - वाडेगाव Akola - Vadegaon या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे मागणीसाठी वाडेगावच्या युवकाने थेट मोबाईल टॉवर Mobile tower वर चढून अनोखे आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अकोला ते वाडेगाव हा रस्ता मागील दोन ते तीन वर्षांपासून रखडलेला आहे. तो रस्ता व्यवस्थित दुरुस्ती न झाल्याने आणि संबंधितांवर कारवाई न झाल्याने आत्मदहनाचा Self-immolation इशारा या युवकाने दिला होता. Unique agitation as the youth climbed the mobile tower for the damaged road

शैलेश मापारी असे या आंदोलनकर्त्या युवकाचे नाव आहे. या बहाद्दराने आज बेसिक शाळेच्या मोबाईल टॉवर वर चढून आंदोलनास सुरुवात केली. अकोला वाडेगाव रस्त्याच्या दुरावस्थे बाबतीत यापूर्वी अनेक निवेदन देण्यात आली आहेत. मात्र अजूनही या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्या विरोधात आता गावातील युवकानेच पुढाकार घेत अनोख्या आंदोलन केले आहे. 

हे देखील पहा -

अकोला वाडेगाव या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यावर साधी सायकल सुद्धा चालविता येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर अनेकांचा अपघात होऊन अपंगत्व आले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. यामुळे प्रशासना यंत्रणेवर फौजदारी गुन्हा Criminal offense दाखल करण्यात यावा. अन्यथा आत्मदहनाचा इशारा करण्यात येणार असल्याचे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. Unique agitation as the youth climbed the mobile tower for the damaged road

तर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परीसरातील नागरीकांनी वेळोवेळी मागणी केली आहे. तरीही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काहीच हालचाली होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. आज आंदोलन सुरू झाल्यामुळे लॉकडाऊन असून सुद्धा ग्रामस्थांचा एकत्रित जमाव पाहायला मिळत आहे. पोलीस Police आता काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com