ब्रिटनला प्लास्टिकचा विळखा

ब्रिटनला प्लास्टिकचा  विळखा


लंडन : पर्यावरणासाठी घातक ठरणाऱ्या प्लास्टिकचा भस्मासूर ब्रिटनसाठीही डोकेदुखी ठरू लागला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून समुद्र सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रिटनमधील सुपरमार्केट्सनी प्लास्टिक बंदीचा विडा उचलला आहे.  जगभरात दरवर्षी 500 अब्ज प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. दरवर्षी किमान 80 लाख टन प्लास्टिक समुद्रात जाते. जगभरातील एकूण कचऱ्यापैकी 10 टक्के कचरा प्लास्टिकचा असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे प्लास्टिकचा भस्मासूर संपवण्यासाठी अनेक देशांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात `सकाळ`ने प्लास्टिकविरोधी खास मोहिम राबवली होती. त्यानंतर सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. भारतासह जगभरातील अनेक शहरे प्लास्टिकच्या समस्यांनी हैराण झाले आहेत. त्यामुळे ब्रिटनने प्लास्टिकविरोधी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तेथील सुपर मार्केट्सनी `न्यूड झोन` आणि `फूड इन दि न्यूड` मोहीम सुरू केली आहे. यापुढे सुपर मार्केट्समध्ये कोणत्याही पदार्थाकरिता प्लास्टिक आवरण न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांनी असा निर्णय घेतला होता. सध्या ब्रिटेनमधील सुपर मार्केटमध्ये केळीही प्लास्टिकच्या आवरणात मिळतात. त्यामुळे दरवर्षी सुमारे आठ लाख 10 हजार टन प्लास्टिक कचऱ्यात जाते़. त्यामुळे पर्यावरणाची हानी होती. प्लास्टिकविरोधी मोहिमेमुळे ही समस्या दूर होईल, असा विश्वास तिथल्या व्यावसायिकांना आहे.


Web Title: united kingdom supermarkets started no plastic Campaign

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com