United Nations: धक्कादायक अहवाल! जगात बालकामगारांची संख्या वाढली

United Nations: धक्कादायक अहवाल! जगात बालकामगारांची संख्या वाढली
Saam Banner Template

संयुक्त राष्ट्राची (United Nations) एजन्सी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (International Labour Organisation) आणि युनायटेड नेशन्स चाइल्ड फंड यांच्या संयुक्त अहवालात अनेक धक्कादायक तथ्य समोर आले आहे. हा अहवाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. हा अहवाल 12 जून रोजी साजरा करण्यात येणा'ऱ्या 'बाल कामगारंविरुद्ध जागतिक दिनाच्या (Child Labour Day) अगोदर जाहीर करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की दोन दशकांत प्रथमच बालकामगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अहवालानुसार संपूर्ण जगात बालकामगारांची संख्या 16 कोटींवर पोहोचली आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे 84 लाख नवीन बालमजुर वाढले आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर लाखो मुलांच्या जीवाला धोका आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. आयएलओ आणि युनिसेफचा हा अहवाल ''Child Labour: Global estimates 2020, trends and the road forward' या नावाने सादर केला आहे.(United Nations Shocking report The number of child laborers in the world increased)

या अहवालाचे वर्णन करताना युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीटा फोर म्हणाल्या की ''या अहवलात जागतिक बँकेला आवाहन केले असून त्यांना जे बाल कामगार म्हणून काम करत आहेत. त्यांना शाळेत जाण्यास प्रवृत्त करावे असे . या अहवालात जगभरातील देशांच्या सरकारांनाही त्यांच्या देशांमध्ये चांगले सामाजिक सुरक्षा कार्यक्रम चालविण्याचे आवाहन केले गेले आहे. जेणेकरुन कुटुंबांना आपल्या मुलांना बालमजुरीवर पाठविण्याची गरज भासू नये''.

हे देखील पाहा

अहवालात इशारा देण्यात आला आहे की दोन दशकांत बालमजुरी संपविण्याच्या प्रगतीचा कालावधीत कमी झाला आहे. अहवालात म्हटले आहे की 2000-2016 दरम्यान बालकामगारांच्या संख्येत सुमारे 9.5 कोटी  घट झाली आहे. पण नंतर या घसरणीचा कल पूर्णपणे बदलला. बालमजुरीमध्ये अगदी लहान मुलांच्या सहभागाविषयीही या अहवालात बोलले गेले आहे.

या अहवालातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2016 पासून आतापर्यंत 5 ते 17 वयोगटातील बालमजुरीची संख्या 65 लाखांनी वाढली आहे. आयएलओचे महासंचालक गाय रायडर म्हणतात की ''अहवालात समाविष्ट केलेली आकडेवारी संपूर्ण जगासाठी चेतावणी देणारी आहे. आकडेवारी दर्शविते की मुलांची आणखी एक पिढी मोठ्या धोक्यात ढकलली जात आहे''.(United Nations Shocking report The number of child laborers in the world increased)

या अहवालात असे सांगितले गेले आहे की आफ्रिकेतील सब-सहारामध्ये गेल्या चार वर्षांत 1.5 कोटी अधिक मुले बालमजुरीचा बळी ठरली आहेत. सध्याच्या साथीच्या आजारामुळे आशिया पॅसिफिक, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशातही या दिशेने होणारी प्रगती आड आली आहे. या अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की साथीच्या रोगामुळे 2022 च्या अखेरीस अतिरिक्त 90 लाख मुलांना बालकामगारात ओढले जाऊ शकते.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com