विद्यापीठाने 'तो' वादग्रस्त निर्णय घेतला मागे...

विद्यापीठाने 'तो' वादग्रस्त निर्णय घेतला मागे...
sppu

पुणे : साविञीबाई SPPU फुले विदयापीठाच्या आवारामध्ये जर आपण व्यायामासाठी Work Out, फिरण्यासाठी अथवा वॉकिंगसाठी Walk येणाऱ्या नागरिकांकरता 'एसपीपीयू ऑक्सि पार्क'  या योजनेंतर्गत नाव नोंदणी करून शुल्क आकारण्याचा निर्णय घेणारे परिपत्रक प्रसिद्ध केले होते.  University backs controversial decision

काल दिनांक ११ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या या परिपत्रकातील वादग्रस्त निर्णयावर टीका होऊ लागल्यानंतर विद्यापीठाने हा निर्णय मागे घेतला आहे. उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय Uday Samant सामंत यांनी देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. परंतू अद्यापही सुधारित परिपत्रक निघाले नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या University निसर्गरम्य ४११ एकर परिसरात विहाराचा आनंद घेण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक येत असतात. या नागरिकांसाठी  विद्यापीठाने 'एसपीपीयू ऑक्सि पार्क ' (SPPU OXY PARK) या योजनेची घोषणा केली होती. 

परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोना Corona पार्श्वभूमी लक्षात घेत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र सदर योजना २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्यावर लागू करण्यात येणार होती व तसा उल्लेख देखील या परिपत्रकात करण्यात आला होता. 

काय आहे एसपीपीयू ऑक्सि पार्क योजना ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विहारासाठी अथवा व्यायामासाठी येणाऱ्या विद्यापीठाबाहेरील नागरिकांना विद्यापीठात या योजनेंतर्गत सदस्यत्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

हे देखील पहा -

सदर सदस्यत्व नोंदणीसाठी नागरिकांकडून शुल्क आकारण्यात येणार होते. मात्र एवढ्या प्रतिष्ठित आणि समृद्ध वारसा लाभलेल्या विद्यापीठात नागरिक विहारासाठी येणार असतील व त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार असा निर्णय विद्यापीठाने घेतलाच कसा यावर आता चर्चा होऊ लागली आहे.

विद्यापीठ आवारात सकाळी व संध्याकाळी विहारासाठी अथवा व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा निर्णय टीकेचा विषय ठरला ठरला होता. विविध विद्यार्थी संघटना व सामाजिक संघटनांनी यावर टीका केली आहे.

स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स या संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले कि, कोरोना काळात सदृढ आरोग्य महत्वाचे आहे, याच मुळे निसर्गरम्य अश्या विद्यापीठाच्या आवारात तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण विहारासाठी अथवा व्यायामासाठी येतात मात्र त्यांच्याकडून अश्या पद्धतीने शुल्क घेण्याचा विद्यापीठाचा निर्णय अन्यायकारक होता. 

मात्र आता 'एसपीपीयू ऑक्सि पार्क' योजनेवर विद्यापीठाने व उदय सामंत यांनी यावर विचारविमर्श करून निर्णय मागे घेतल्यामुळे विद्यापीठाच्या आवारात जाणाऱ्या अभ्यंगतांना दिलासा मिळाला आहे. 

By : Krushnarav Sathe 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com