महाराष्ट्रात १ जून पासून चार टप्प्यात अनलॅाक सुरु होणार.. (पहा व्हिडीओ)
0sangali_20lockdown

महाराष्ट्रात १ जून पासून चार टप्प्यात अनलॅाक सुरु होणार.. (पहा व्हिडीओ)

मुंबई: राज्यातील State काही जिल्हे वगळता राज्यात इतरत्र कोरोनाचा  Corona प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे 15 एप्रिलपासून राज्यात सुरू असलेले कठोर निर्बंध Restrictions हे टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा विचार राज्य सरकार State Government करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या 31 मे पर्यंत हे नियम लागू आहेत. या कालावधीत एकूण रुग्णांची संख्या सध्या निम्म्याने कमी झाल्याने अनलॉक Unlock प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात चार टप्प्यात अनलॉक सुरू होणार आहे. Unlock will start in Maharashtra in four phases from June 1

कशी असेल टप्प्यानुसार अनलॉक प्रक्रिया -
पहिला टप्पा : 
दुकानांना सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. 
दुसरा टप्पा : 
दैनंदिन गरजांच्या दुकानं सुरू ठेवण्याची मुभा इतर काही दुकाने एक दिवसाआड सुरू ठेवण्याची शक्यता आहे. 
तिसऱ्या टप्पा :
या टप्प्यात हॉटेल्स 50 टक्के, तर दारूच्या दुकानांना निर्बंधसह सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येईल. 
चौथ्या टप्पा :
मुंबईची लोकल, धार्मिक स्थळ, जिल्हा बंदी पुढे ढकलली जाऊ शकते. 

व्यापारी वर्गाने Merchant class ज्याप्रमाणे राज्य सरकारला वारंवार विनंती केलेली आहे, त्याचा गांभीर्याने विचार करून दुकानांना काही वेळेपुरती उघडण्याची मुभा देण्यात येईल. सध्या ही दुकानं अकरा वाजेपर्यंत खुली आहेत. मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहू शकतील असे देखील सांगण्यात आलेले आहे. Unlock will start in Maharashtra in four phases from June 1

त्याच प्रमाणे दैनंदिन गरजा संदर्भात काही महत्त्वाची दुकाने देखील सुरू ठेवण्यास संदर्भात परवानगी देखील दिली जाऊ शकते. आणि परमिट रूम, बियर बार, दारूचे दुकान यांनादेखील सुरू ठेवण्याची परवानगी देऊ शकतात. तसेच पन्नास टक्केच क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा दिली जाऊ शकते.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com