मोबाईल व्हॅनद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू

मोबाईल व्हॅनद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू
mobile van

रत्नागिरी - जेष्ठ नागरीक आणि दिव्यांग व्यक्तींना लसीकरणबाबत Vaccination अडचणी निर्माण होत होत्या. ऑनलाईन Online होणारं लसीकरण, लसीकरणासाठी केंद्रावर फिरावं लागणं. यामुळे लसीकरणबाबत होणारा त्रास लक्षात घेता आणि रत्नागिरीतील Ratnagiri जेष्ठ नागरिक senior citizen आणि दिव्यांगांसाठी फिरते लसीकरण mobile van केंद्र सुरु करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी  हे लसीकरण केंद्र सुरु  केले आहे. शहरातील साळवी स्टाँप , शिवाजीनगर या  परिसरात सुरुवातीला लस देण्यात आली.शहरातील अनेक भागात लसीकरण करण्यात येणार आहे.ज्यांना लसीकरण केंद्रावर जाणे शक्य नाही, असे दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांची पूर्व नोंदणीकरून घेऊन सौरभ मलुष्टे यांनी उपलब्ध केलेली व्हॅन नागरिकांपर्यंत  आरोग्य खात्याच्या स्टाफसह नेली जाणार आहे. 

जि. प. आरोग्य विभागाच्या सहकार्याने सौरभ मलुष्टे राबवित असलेल्या 'लसीकरण ऑन व्हील' उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले.  ही मोबाईल व्हॅन शहराप्रमाणे लगतच्या ग्रामीण भागात देखील नेण्याची मागणी दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.या उपक्रमामुळे जेष्ठ नागरीक आणि दिव्यांग व्यक्तीची लसीकरणासाठीची होणारी परवड दूर झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com