एकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव 
Saam Banner Template

एकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव 

पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना इन्फ्ल्युएन्झा आणि 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे.  आज एकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण पूर्ण केले आहे. संपूर्ण लसीकरण झालेले हे देशातील पहिले गाव ठरले आहे.  सहकार महर्षी व पुरंदरचे लोकप्रतिनिधी चंदूकाका जगताप यांच्या 72 व्या जयंतीचे औचित्य साधून या गावातील लोकांना मोफत लसीकरण झालेले आहे. (Vaccination of the whole village on the same day; Bahirwadi became the first village in the world)

पुरंदर-हवेलीला कोरोना मुक्त करण्याचा मानस असून त्याचे पहिले पाऊल टाकत आज पुरंदरमधील दुर्गम भागातील बहिरवाडी येथे जागतिक आरोग्य संघटना, भारतीय बाल आरोग्य संघटना, आयसीएमआरच्या सूचनेनुसार 6 ते 17 वयोगटातील सर्व मुलांना व मुलींना आणि 18 वर्षावरील सर्व नागरिकांना ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून मोफत लसीकरण होत आहे.  त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण गावातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आल्याचा आणि पूर्ण गाव कोरोना मुक्त करण्याचा मान संपूर्ण राज्यात पुरंदर तालुक्याला बहिरवाडी गावाला मिळाला आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. त्याचबरोबर, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरणावरती जोर द्यावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन लसीकरणाला चालना देणे गरजेचे आहे. जगातील अनेक देशांनी लसीकरण करून कोरोनावरती विजय मिळवला आहे. त्यामुळे बहिरवाडी गावासारखी मोहीम जर ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यांची राबवली तर देश कोरोना मुक्त व्हायला जास्त वेळ लागणार नाही.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com