देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याचा प्रताप RTI मधून उघड !

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याचा प्रताप RTI मधून उघड !
devendra fadnavis

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र Devendra Fadnavis फडणवीस यांचा पुतण्या Nephew तन्मय Tanmay Fadnavis फडणवीस याच्या लसीकरणाचा विषय एप्रिल महिन्यात चांगलाच रंगला होता. Vaccine taken by Devendra Fadnavis Nephew Tanmay as Health Worker

पहा व्हिडीओ -

मात्र आता RTI च्या माध्यमातून एक नवा खुलासा समोर आला असून त्याच पार्श्वभूमीवर आता नव्याने रान पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारामती येथील RTI कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलेल्या माहिती अधिकार अर्जातून एक नवी बाब समोर आली आहे. 

देवेंद्र फडणवीसांचा पुतण्या असलेल्या व माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असलेल्या तन्मय याने लसीचा पहिला  Vaccine डोस Dose मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये घेतला होता.

मात्र हा डोस त्याने आरोग्य सेवक या कोट्यातून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ट्विटर अकाउंटवर स्वतःचा उल्लेख ऍक्टर असा असलेल्या तन्मय हा आरोग्य सेवक कसा हा सवाल आता नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे. 

ट्विटर अकाउंट वर ऍक्टर असा उल्लेख असलेल्या तन्मय फडणवीस ने तेव्हा वयाच्या अटींमध्ये बसत नसताना देखील लस घेतली होती व या लसीकरणाचा फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेयर केला होता.

यावर  Shivsena शिवसेना, NCP राष्ट्रवादी, Congress काँग्रेस या प्रमुख पक्षांसह राज्यभरातील युवकांनी तन्मय व देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं तसेच सर्वसामान्य युवकांना लस नाही व मंत्री आमदारांच्या घरातील युवकांना लस मिळतेच कशी असा सवाल देखील नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता.  

वयाच्या अटीत बसत नसताना देखील त्याने लस घेतलीच कशी हा सवाल उठू लागल्यावर देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण देताना तन्मय हा माझा दूरचा नातेवाईक असून त्याला कोणत्या निकषानुसार लस मिळाली हे मला माहित नसल्याचे सांगावे लागले होते. 

मात्र आता माहिती अधिकार कार्यकर्ते असलेल्या नितीन यादव यांनी माहिती अधिकारातून आलेल्या या उत्तरावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू व देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या असणाऱ्या  तन्मय याने पहिला डोस आरोग्य सेवक म्हणून घेतल्याची नोंद आहे. 

तशी माहिती RTI मधून स्पष्ट झाली आहे. मात्र  ट्विटरवर स्वत:ची ओळख अभिनेता म्हणून सांगणाऱ्या तन्मय याला देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या असल्यामुळे लस देण्यात आली आहे का ? की ऍक्टर आहे म्हणून लस मिळाली ? आरोग्य सेवक आहे म्हणून लस मिळाली की त्याने आरोग्य सेवक असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून लस घेतली ? असे प्रश्न नितीन यादव यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com