नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव चव्हाण, उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर

नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव चव्हाण, उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर
Vasantrao Pawar - Harharrao Bhosikar

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे Congress माजी आमदार वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. Vasantrao Chavan has been elected as the Chairman of Nanded District Bank

निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केला. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी नुतून अध्यक्ष, उपाध्यक्षांना शुभेच्छा दिले आहे. 

जिल्हा बँकेच्या आज झालेल्या निवडणुकीत Election अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी दोनच अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध पार पडली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हा बँक निवडणुकीत 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली.Vasantrao Chavan has been elected as the Chairman of Nanded District Bank

तर भाजप  BJP प्रणीत पॅनलचे चारच उमेदवार निवडून आले होते. आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सदस्यांनी सहभाग घेतला नसल्याने निवडणुक बिनविरोध झाली. यावेळी नुतून अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी बँकेची अर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com