पिंपरी - चिंचवड मध्ये वाहनांची तोडफोड... 

पिंपरी - चिंचवड मध्ये वाहनांची तोडफोड... 
Vehicle vandalism in Pimpri Chinchwad

पुणे : पिंपरी - चिंचवड  Pimpri- Chinchwad  शहरातील महातोबा नगर परिसरात ऑटो Auto रिक्षा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही दारुड्याच्या टोळक्या कडून ऑटो रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे. Vehicle vandalism in Pimpri-Chinchwad 

शहरात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना कायम सुरू आहेत. जवळपास १५ ऑटो रिक्षाची तोडफोड, दारुड्याच्या टोळक्याने केली आहे. स्थानिक नागरिकांन मध्ये आपली दहशत पसरविण्यासाठी दारुड्याच्या टोळक्याने ही वाहनाची तोडफोड केली आहे. ही तोडफोड दगड घालून करण्यात आली आहे.

हे देखील पहा   

याबाबत नागरिकांनी तक्रार दिली आहे. वाहनाची तोडफोड करणाऱ्या किरण गाडगे, रवी गाडगे, सागर गाडगे, चंद्रकांत गायकवाड, अविनाश गायकवाड आणि मयूर अडागडे या आरोपींना वाकड Wakad पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून Police कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com