बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल 

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल 
दिलीप कुमार.jpg

वृत्तसंस्था : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार  Dilip Kumar यांना  आज (6 जून) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दिलीप कुमार यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्यांना  मुंबईच्या पीडी हिंदुजा रुग्णालयात PD Hinduja Hospital  दाखल करण्यात आले. अशी माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानो Saira Bano यांनी दिली आहे. दिलीप कुमार आता 98  वर्षांचे आहेत. रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत.  रुग्णालायात दाखल केल्यानंतर मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  गेल्या महिन्यात नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या दिलीपकुमार यांना दोन दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता.  (Veteran Bollywood actors Dilip Kumar admitted to hospital) 

दरम्यान, दिलीप कुमार यांनी  गेल्या वर्षी मार्चपासून दिलीपकुमार आणि सायरा बानो कोरोना विषाणूच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या सर्व चाहत्यांना घरी राहण्याची विनंती केली आहे. सायरा बानो दिलीप कुमार यांची  खूप  काळजी घेत आहेत.  डिसेंबर 2020 पासून दिलीपकुमार यांच्या तब्येतीत अनेक चढ उतार होताना दिसत आहेत. काही दिवसांपासून  त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे, मात्र आज हा त्रास वाढल्याने त्यांना आज सकाळी तातडीने रुग्णालयात  दाखल केले आहे.  वय आणि आजारपणामुळे दिलीप कुमार  आता खूपच अशक्त झाले आहेत. त्यांची  प्रतिकारशक्ती देखील कमी झाली आहे. 

सायरा बानो वयाच्या 12 व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. अनेक प्रयत्नानंतर त्यांनी  लग्न करण्याचा निर्णय घेतला.  मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये त्यांची पाहिल्यांदाच दिलीपकुमार यांच्याशी पहिली भेट झाली होती, असे एक मुलाखतीत सायरा बानो यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे सायरा बानो पहिल्याच भेटीत दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या.  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com