VIDEO| 'मरे'चा पॉवर ब्लॉक

VIDEO| 'मरे'चा पॉवर ब्लॉक

ख्रिसमसच्या दिवशी म्हणजेच उद्या मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक घेण्यात येणारंय... ठाकुर्ली स्थानकावर पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात..

मध्य रेल्वे ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलासाठी सहा मीटर रुंदीचे चार गर्डर टाकणार असल्याने बुधवारी 25 डिसेंबर रोजी कल्याण ते डोंबिवलीदरम्यान सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 असा चार तासांचा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या चार तासांत कल्याण ते डोंबिवलीदरम्यान एकही ट्रेन धावणार नसल्याने नाताळच्या दिवशी प्रवाशांची गैरसोय होणार आहे. 

डोंबिवली ते कल्याणदरम्यान अप-डाऊन जलद, धीमा मार्ग आणि 5-6 व्या रेल्वे लाइनवर स्पेशल पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.45 ते दुपारी 1.45 वाजेपर्यत रस्त्यावरील चारशे मेट्रिक टन क्षमतेच्या अजस्र क्रेनद्वारे चार गर्डर टाकले जाणार आहेत. त्यामुळे डोंबिवली ते कल्याणदरम्यानची लोकलची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

याशिवाय नांदेड एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस, हैदराबाद एक्स्प्रेसना दिवा-पनवेल-कर्जतमार्गे चालविण्यात येणार असून या गाडय़ांना कल्याणऐवजी दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे. तसेच अनेक गाडय़ांच्या मार्गात बदल करण्यात आला असून अनेक गाडय़ा मधल्या स्थानकात काही मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहेत.

WebTittle: :  VIDEO | Central railway power block

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com