नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Eknath Shinde

सातारा - मान्सूनची सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु झालीय, मात्र महाराष्ट्रातील मंत्री देखील आपल्या शेतात जाऊन पेरणीचा आनंद घेताना दिसत आहेत.  Video of Minister Eknath Shinde sowing goes viral

पहा व्हिडीओ -

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री Minister for Urban Development एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचा महाबळेश्वर Mahabaleshwar तालुक्यातील त्यांच्या मुळगावी पेरणी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ना.एकनाथ शिंदे हे बऱ्याच वेळा जन्मगावी दरे तर्फ तांब या ठिकाणी येत असतात.

गावात असणाऱ्या शेतीकडे Farming त्यांचा जास्त कल आहे. सध्या पावसाळी पिकांच्या पेरण्या सुरु आहेत. त्यामुळे शेतात पेरणी सुरू असताना शिंदे यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट करून,पारंपरिक पद्धतीने तरव्याच्या ठिकाणी पेरणी करून कुदळ्याने संपूर्ण तरवा कुदळून भाताची पेरणी पूर्ण केली.

पूर्वीपासून कायम गावी आल्यावर शेतीच्या कामात ते कायम व्यस्त असतात उन्हाळ्यात त्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केली होती. मंत्री एकनाथ शिंदे यांना नेहमीच्या धावपळी मधून थोडा वेळ काढून गावामध्ये येऊन राहायला कायम आवडत असल्याने आणि मुळात शेतीची आवड असल्याने त्यांचे शेती प्रेम त्यांना वारंवार गावाकडे घेऊन येताना पाहायला मिळते. 

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com