उपविभागीय पोलीस अधिकारीऱ्या मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

उपविभागीय पोलीस अधिकारीऱ्या मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Saam Banner Template

जालना -  जालन्यातील Jalna भाजपा BJP युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवराज नारीयालवाले यांना पोलिसांनी Police लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ Video काही दिवसांपूर्वीचा आहे. या व्हिडीओत तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर Sudhir Khiradkar यांनी गवळी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.  Video of a subdivisional police officer goes viral

गवळी समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलल्याचे चित्रीकरण केल्याने पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी शिवराज नारीयालवाले यांना बेदम मारहाण केली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. 

हे देखील पहा -

दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना काही दिवसांपूर्वी 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांनी गवळी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द बोलल्यानंतर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून खिरडकर यांच्यासह मारहाण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गवळी समाजाकडून आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनांद्वारे केली जाणार आहे. Video of a subdivisional police officer goes viral

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com