चक्रीवादळाचा सामना करण्यास यंत्रणा सज्ज : विजय वडेट्टीवार

चक्रीवादळाचा सामना करण्यास यंत्रणा सज्ज : विजय वडेट्टीवार
vijay

चंद्रपूर : कोकण kokan किनारपट्टीला बसणार असलेल्या चक्रीवादळासंदर्भात Cyclone मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार  Vijay Vadettiwar यांनी चंद्रपुरात Chnadrapur दिली. चक्रीवादळ धडकल्यानंतर वीज पुरवठा खंडित होत असल्याची स्थिती लक्षात घेता वीजपुरवठा electricity सुरळीत करण्यासाठीचे युद्ध स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोकणातील पाच जिल्ह्यांना भूमिगत वीज वाहिन्याद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी योजना आखली जाणार आहे. Vijay Vadettiwar on cyclone

प्रत्यक्ष चक्रीवादळाप्रसंगी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी भक्कम निवारा गृहे उभारले जाणार आहेत. सद्यस्थितीत पक्क्या इमारतींना निवारागृहे म्हणून वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा -

पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांना सज्ज राहण्याचा दिला इशारा देण्यात आला असून, उद्या पंतप्रधान मोदी देखील चक्रीवादळासंदर्भात तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती देत आढाव्यानंतर अधिकच्या उपाययोजना करणार असल्याचे विजय  वडेट्टीवार म्हणाले. Vijay Vadettiwar on cyclone

दरम्यान,  दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, चक्रीवादळात त्याचे रूपांतर होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे पुढील २४ तासांमध्ये वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 'तौत्के'असे या वादळाचे नाव असून या वादळाचा १५, १६ आणि १७ तारखेला प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ,सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी 'ऑरेंज अॅलर्ट' दिला आहे.   

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com