आता 'विक्रम'कडे शेवटचे चार दिवस

आता 'विक्रम'कडे शेवटचे चार दिवस

पुणे : देशाची महत्वाकांक्षी अवकाश मोहीम 'चांद्रयान-२' इस्रोच्या वैज्ञानिकांच्या तांत्रिक कौशल्याची परीक्षा घेणारी ठरत आहे. ७ सप्टेंबरच्या भल्या पहाटे चांद्रयानाचे लँडर 'विक्रम' चांद्रभूमीवर उतरत असताना अवघ्या २.१ किमी उंचीवरून त्याचा संपर्क तुटला. आजतागायत त्याच्याशी कोणताही संपर्क प्रस्थापित करण्यात विज्ञानिकांना यश आले नाही. आता फक्त पुढील चार दिवसातच संपर्क झाला तरच लँडर विक्रमद्वारे वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवणे शक्य होणार आहे.

चांद्रभूमीवर चौदा दिवस उजेड आणि तेवढ्याच दिवसाची रात्र. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर येत्या २१ सप्टेंबरला अंधार पडणार आहे. त्यामुळे तिथे पुढील १४ दिवस रात्र असणार आहे. चंद्रावर उजेड असताना दक्षिण ध्रुवावरील तापमान १२० डिग्री सेल्सियस असते आणि अंधार पडल्यावर तेच तापमान क्षणार्धात उणे २३२ डिग्री सेल्सियस पर्यंत जाते. अशा तापमानात कोणतेही संयंत्र काम करणे शक्य नाही. त्यामुळे पुढील चार दिवसानंतर 'विक्रम' मृतप्राय होईल.

चांद्रयान-२ मधून काय साध्य झाले

- भुस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान अर्थात 'GSLV Mark - 3' ची यशस्वी चाचणी झाली. सुमारे ४ टन वजनाचा उपग्रह ३५ हजार किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करण्याचे तंत्रज्ञान प्राप्त.
- चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याची यशस्वी चाचणी.
- मात्र चांद्रभूमीवर अलगदपणे लँडर उतरवण्यात अपयश.
- चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरच्या माध्यमातून दक्षिण ध्रुवाबद्दल अधिक माहिती मिळवणे शक्य.

Web Title: Vikram lander left only next four days

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com