पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा, आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी

पालखी सोहळा लालपरीनेच व्हावा, आळंदीच्या ग्रामस्थांची मागणी
पालखी सोहळा.jpg

आळंदी -  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना corona  महामारीचे सावट आहे. यामुळे मागील वर्षी झालेल्या चुका टाळून यावर्षीही माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत व्हावा, विशेष म्हणजे सुरक्षिततेच्या कारणास्तव लालपरी बसने आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा पार पडावा,  अशी मागणी आळंदी ग्रामस्थांकडून  करण्यात आली आहे. The villagers of Alandi demanded that the palanquin ceremony should be held in Lalpari

या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना आळंदी ग्रामस्थांच्यावतीने माऊली भक्त ज्ञानेश्वर कु-हाडे पाटील यांनी दिले असल्याचे सांगितले आहे. 

हे देखील पहा - 

वर्ष 2020  मध्ये सुरू झालेले कोरोना संकट अजून दूर झालेले नसल्याने यावर्षीही मागील वर्षाप्रमाणे मोजक्याच भाविकांत आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्याचे  नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही पूर्णपणे  कमी झालेला नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग गर्दीत जास्त वाढत असल्याने, गर्दी नियंत्रित राहावी. तसेच पालखी सोहळ्यामुळे  कोरोनाचे संकट वाढू नये. म्हणून यावर्षीही शासनाने आळंदी पंढरपूर पालखी सोहळा बसने मोजक्याच भाविकांत साजरा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

मागील वर्षी कुंभमेळा, पंढरपूर पोट निवडणूक, तसेच इतर ग्रामपंचायत निवडणुका, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रम यामुळे देखील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे.  हा अनुभव लक्षांत घेता यावर्षी पालखी सोहळा कोरोना महामारी संकट कायम असल्याने शासनाने व्यापक लोक हितासाठी सामाजिक आरोग्याची काळजी घेवून कोरोना महामारी वाढू नये यासाठी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत बसने पालखी सोहळा साजरा करावा.

पायी वारी करणाऱ्यांनी हट्ट सोडवा,  तसेच संतांची शिकवण सामाजिक आरोग्य, सलोखा, विश्वशांतीचा विचार करून कोरोना महामारीचे संकट असल्याने याचा विचार करून मागणी करण्यात आली आहे. 

पालखी सोहळा बसने ये-जा करतांना प्रथा - परंपरांचे पालन व्हावे. प्रस्थाना नंतर व परत वारीहून आल्यानंतर आपआपल्या मंदिरांत धार्मिक कार्यक्रम मागील वर्षीप्रमाणे करून आषाढी वारी सोहळा मोजक्याच लोकांत शासनाचे कोरोना संदर्भातील नियम, सूचना, आदेशांचे पालन करीत पालखी सोहळा साजरा व्हावा यासाठी शासनाकडे मागणी निवेदनातून करण्यात आली असल्याचे आळंदी ग्रामस्थांच्यावतीने ज्ञानेश्वर कु-हाडे यांनी सांगितले.

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com