कोरोनाने मृत्यू पावलेल्या आईच्या दिव्यांग कुटुंबाला पाणी नाही दिलं !

कोरोनाने मृत्यू पावलेल्या आईच्या दिव्यांग कुटुंबाला पाणी नाही दिलं !
Beed

बीड : कोरोनाने Corona  माणसातली माणुसकी Humanity हरवत Lost असल्याचा प्रकार, नुकताच बीडमध्ये Beed समोर आला  आहे. बीडच्या वारणी गावातील संपूर्ण अंध Blind, दिव्यांग Crippled धोत्रे कुटुंबाचा Family आधार असलेल्या सोनाबाई Mother धोत्रे, यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन Death झाले. Villagers Refuse To Give Water To Crippled Family Of Woman Died By Corona  

त्यांचा अंत्यविधी प्रशासनाने केला. मात्र अंत्यविधी करून दिव्यांग धोत्रे कुटुंब गावात आल्यावर, गावातील Villagers लोकांनी या कुटुंबाला अक्षरशः वाळीत टाकले. घरात दुःखद प्रसंग असताना, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी घराची दारे लावून घेतली.

 हे देखील पहा -

गावातील हातपंपाची चैन काही खोडसाळ व्यक्तीनी काढून नेली. तर शेजारच्या बोर वाल्याने पाणी Water देण्यास नकार Refuse दिला. यामुळे दोन दिवस घरात पाणी नव्हते. तर आम्हाला आधाराशिवाय दुसरीकडून पाणी आणता आले नाही. असं सांगताना त्या दिव्यांग असणाऱ्या महिलेच्या डोळ्यात पाणी तरळले. Villagers Refuse To Give Water To Crippled Family Of Woman Died By Corona  

शेवटी  नाईलाज म्हणून सामाजिक कार्यकर्त्याला फोन केला आणि ते मदतीला धावले. त्यांनी पाणी उपलब्ध करून दिले. मात्र कोरोनामध्ये दिली जाणारी वागणूक माणसाच्या हृदयाला घर करत आहे..

बीडच्या शिरूर कासार तालुक्यात असणाऱ्या, वारणी गावचे लक्ष्मण धोत्रे यांना चार मुले आणि एक मुलगी आहे. विशेष म्हणजे हे धोत्रे कुटुंब दिव्यांग आहे. त्यांच्या सुना देखील दिव्यांग आहेत. त्यामुळे या कुटुंबाची पालन पोषण करण्याची जबाबदारी ही सोनाबाई धोत्रे यांच्यावर होती.Villagers Refuse To Give Water To Crippled Family Of Woman Died By Corona  

मात्र या कोरोनाच्या महामारीने सोनाबाई यांनाही घेरलं अन त्या 11 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यांना उपचारासाठी बीडला दाखल केले होते. मात्र धोत्रे कुटुंबावर नियतीने घाला घातला अन कुटुंबातील सर्व दिव्यांग सदस्यांच्या आधार असणाऱ्या, सोनाबाई यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

यावेळी प्रशासनाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र अंत्यसंस्कार करून गावात आल्यावर, या दिव्यांग कुटुंबाला लोकांनी अंगावर काटा येईल अशी वागणूक दिली. कुटुंबातील दिव्यांगाची आधार असलेली 55 वर्षाची आई निघून गेल्यानंतर या चारही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, समाजाने दिलेली वागणूक चीड आणणारी आहे. Villagers Refuse To Give Water To Crippled Family Of Woman Died By Corona  

घराजवळ आल्यानंतर एकानीही साधी विचारपूस केली नाही. एवढंच नाही तर पिण्यासाठी पाणी सुद्धा भरू दिले नाही. त्यामुळं अंत्यविधी करून आल्यानंतर साधी आंघोळ देखील करता आली नाही. विशेष म्हणजे शाळेजवळ असणाऱ्या सार्वजनिक हातपंपाची साखळी,  खोडसाळ वृत्तीच्या लोकांनी काढून नेली. यामुळे तब्बल दोन दिवस या कुटुंबाला, पाण्याविना राहावे लागले.

शेवटी सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट यांना फोन केल्यानंतर, त्यांनी प्रत्यक्ष अंध कुटुंबाला भेट दिली. तसेच शेजारच्या सोबत भांडून त्यांच्या घरात पाणी भरून दिले आणि नंतर तहसील प्रशासनाने ग्रामपंचायत यांना सांगून सार्वजनिक हातपंप दुरुस्त करून घेतला. मात्र या निराधार अन दिव्यांग असणाऱ्या कुटुंबाला जी वागणूक दिली, ती म्हणजे माणुसकी हरवल्याचचं चित्र स्पष्ट करणारी आहे ! 

Edited By Krushnarav Sathe  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com