विनायक मेटे यांचा सरकारवर हल्लाबोल...

विनायक मेटे यांचा सरकारवर हल्लाबोल...
vinyak mete

बीड - मराठा आरक्षण Maratha reservation लढ्याच्या दुसऱ्या पर्वाला, बीडमधून Beed सुरुवात झालीय. आमदार विनायक मेटे Vinayak Mete यांच्या उपस्थितीमध्ये सर्व मराठा संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. Vinayak Mete attacks on the government

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजामध्ये संतापाच्या भावना निर्माण झाल्या आहेत. या बीडमधील मराठा समाजातील जनक्षोभाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यात प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अशोक चव्हाण Ashok Chavan यांची त्वरित हकालपट्टी करा अश्या मागण्या प्रामुख्याने निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी विनायक मेटे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या Government नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण रद्द झाले. सरकारने मराठा समाजाचे आरक्षण कधीही गांभीर्याने घेतले नाही, कोर्टाकडे Court दुर्लक्ष केले. असा गंभीर आरोप देखील या निवेदनात केला आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन आणि संघर्ष करण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. असे निवेदनात नमूद केले आहे. Vinayak Mete attacks on the government

हे देखील पहा -

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाला न्याय कसा देणार, आरक्षणाचं काय ? सोयी सवलती कोणत्या देणार आहात हे त्यांनी प्रथमतः स्पष्ट करावे त्यानंतर काय तो पत्र प्रपंच करावा अशी टिप्पणी देखील विनायक मेटे यांनी केली आहे.

आता मराठा समाजास आरक्षण कसे देणार पुढील भूमिका काय असणार? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावे असे देखील आमदार विनायक मेटे म्हणाले.

Edited By- Krushna Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com