संभाजी राजेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर विनायक मेटेंची टीका 
vinayak mete and sambhaji raje

संभाजी राजेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर विनायक मेटेंची टीका 

6 तारखेला ते मोर्चा काढतायेत, अगोदर ते आम्हाला नावं ठेवत होते. तुम्ही तरुणांची दिशाभूल करत आहात असं म्हणत होते. आता तेही आमचं पाहून मोर्चा काढत आहेत. आत तेही दिशाभूल करणार आहेत का? कधी वेगळा निर्णय घेतात तर कधी मोर्चाला विरोध करतात. त्यांनीच निश्चितपणाने भूमिका घेण्याची गरज आहे.  त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतोय.(Vinayak Mete criticizes Sambhaji raje )

मराठा समाजाला लवकरात लवकर कसं आरक्षण मिळेल याकडे लक्ष केंद्रित करावं. आरक्षण मिळेपर्यंत माझा लढा थांबणार नाही. अस म्हणत आमदार विनायक मेटे यांनी नाव न घेता संभाजी राजेंवर टीका केली आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्याचबरोबर काल मोर्चा काढल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र मेट्रोच्या कार्यक्रमाला हजारो लोक होते. मुख्यमंत्र्यांसह त्याही लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे.

हे देखील पाहा

दरम्यान, खासदार संभाजी राजे यांनी २८ तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करणायचा इशारा दिला होता. त्या आंदोलनाची तारीख ६ जून अशी ठरवण्यात आली होती. परंतुृ, आज माध्यमांशी बोलताना संभाजी राजेंनी आपण १६ तारखेपासून मोर्चा काढणार आहे असे सांगितले. त्याला उदयन राजे भोसले यांनी पाठिंबा दिला आहे. १६ तारखेच्या आंदोलनात सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.    

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com